महिलांच्या पाठीशी मनसे खंबीर, वणी विधानसभा क्षेत्रात महिलांचा मनसे कडे ओघ.

0
306

मनसे नेते राजु उंबरकर यांच्या उपस्थितीत हजारो महिलांचा मनसेत प्रवेश..

महिलांच्या पाठीशी मनसे खंबीर, वणी विधानसभा क्षेत्रात महिलांचा ओघ मनसेकडे.

लोकवाणी जागर वृत्त….

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. यातच वणी मतदारसंघातील झरी तालुक्यातील हजारो महिलांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षात त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. आगामी काळात पक्ष संघटन वाढीसाठी तसेच पक्षाचे विचार आणि कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम नक्कीच यशस्वीरीत्या पार पाडतील. असा विश्वास उंबरकर यांनी व्यक्त केला.

राजू उंबरकर यांच्या कार्याला प्रभावित होऊन आम्ही सर्व महिला मनसेत प्रवेश करत असल्याची महिलांनी भावना व्यक्त केल्या. मनसेच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार, आरोग्य, लग्न असेल आदी सारख्या प्रत्येक वेळी उंबरकर मदतीला धावून येतात हीच मनसेची शिकवण असल्याचे सर्व महिलांच्या भावना आहेत. येणाऱ्या काळात राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व महिला भगिनी जोमाने काम करून मनसेला विजयी करण्यासाठी जीवच रान करू असेही म्हटले आहे. येणाऱ्या काळात आता वणी मतदारसंघात मनसेचा उमेदवार विजयी करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार महिलांनी केला.

दुसरी गोष्ट म्हणजे मनसेची महाराष्ट्रात ताकद वाढताना दिसत आहे. मनसे गाव-खेड्यापर्यंत पुन्हा एकदा जास्त घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे मनसे पक्षात कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या पक्ष प्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे. या पक्षप्रवेश मुळे पक्षाची ताकद अधिक वाढणार असून निवडणुकीत याचे परिणाम दिसतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यावेळी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, महिला सेना मनसे जिल्हाध्यक्षा अर्चना बोधाडकर,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, झरी न. प. चे नगर उपाध्यक्ष नानु कोडापे, आरोग्य सभापती प्रवीण लेनगुळे, तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले, गुलाब आवारी, फाल्गुन गोहोकार, मोहन अर्के, विलन बोधाडकर, विठ्ठल हेपट, काशिनाथ कुमरे, चेतन हेपट, शिवराज पेचे, पप्पू चुक्कलवार, मुस्ताख शेख, संगिता कोडापे, छाया रोयपाटे, शोभा तलांडे, वर्षा गोहने, बेबी उईके आदी उपस्थित होते..

महिलांच्या पाठीशी संकट वेळी मनसेची खंबीर भूमिका – राजू उंबरकर.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुरूषांसोबतच महिला भगिनी देखील मनसेत पक्षप्रवेश करत आहेत. एक विश्वासू नेतृत्व म्हणून सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पाहिले जात असून हा पक्ष प्रवेशाचा ओढ असाच कायम राहील. महिला भगिनीचा पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपल्या पक्षाची शिकवण आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here