मारेगावात चार दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होणार भीमोत्सव.
विविध स्पर्धा, आर्केष्टा, व्याख्यान व अभिवादन व रॅली अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मारेगाव : आनंद नक्षणे.
विश्वभूषण,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तथा आंबेडकरी अनुयायी चे वतीने सलग चार दिवस विविध कार्यक्रम घेऊन मारेगावात भीमोत्सव 2024 साजरा करण्यात येणार आहे.
सम्राट अशोक जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीच्या औचित्याने 11एप्रिल रोजी 20 ते 25 वयोगटातील महिलासाठी रांगोळी स्पर्धा व मटकी फोड स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.
12 एप्रिल रोजी संगीत खुर्ची व भीम बुद्ध गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मेडल, मोमेन्टो व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.13 एप्रिल रोजी सायंकाळी हिंगणघाटकर भीमोत्सव आर्केष्ट्रा सादर करणार आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मारेगाव येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजता ” भारतीय संविधान, लोकशाही व नागरिकांची जबाबदारी” यावर मुंबई येथील प्रमुख वक्ते डॉ. गौतम शिवाजी मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रा. डॉ. अनिता कांबळे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक मारेगाव शहरातून निघणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.