शिवसेनेला मोठा धक्का! बंडू चांदेकरांचा भाजपमध्ये पुन्हा ‘कमळ’ हाती घेत धडाकेबाज प्रवेश

0
391

शिवसेनेला मोठा धक्का! बंडू चांदेकरांचा भाजपमध्ये पुन्हा ‘कमळ’ हाती घेत धडाकेबाज प्रवेश.

राजु तुरणकर – संपादक.

मुंबई : शिवसेना (उभाठा) गटाला मोठा धक्का देत यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी नेते बंडू चांदेकर यांनी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये धडाकेबाज पुनःप्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल भाऊ चव्हाण, माजी आमदार संजिव रेड्डी बोदकुरवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मुन्ना बोलेनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

बंडू चांदेकर हे मूळचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. मात्र माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडत भाजपमध्ये प्रवेश करून यवतमाळ जिल्हा परिषद सदस्यपद मिळवले आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामगिरीची छाप पाडली.

यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय दरेकर आमदार झाल्यानंतर चांदेकर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु शिवसेना (उभाठा) गटात सुरू असलेल्या अंतर्गत घुसफूस, गटबाजी आणि अपेक्षित मानसन्मान मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

माजी आमदार संजिव रेड्डी बोदकुरवार व मंत्री अशोक उईके यांच्या चर्चेनंतर हा निर्णय अंतिम झाला आणि मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्यांनी अधिकृतपणे कमळ हाती घेत भाजपमध्ये पुनःप्रवेश केला.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्राचे राजकारणात या प्रवेशामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here