वणी शहरात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके पुतळा बसविण्यासाठी पोलिस परवानगीचा मुद्दा चर्चेत.
उपविभागीय अधिकाऱ्यांना आदिवासी समाजाचे निवेदन.
राजु तुरणकर वणी .
वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील नांदेपेरा रोड बायपास चौफुली येथे गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे नावाने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचलित आहे. या चौकात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, त्यासाठी पोलिस विभागाची ना हरकत , परवानगी मिळविण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकृत अर्ज सादर करण्यात आला आहे.
कुंदन हनुमान पेंदोर यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, वणी यांच्याकडे याबाबत विनंती केली आहे. संबंधित ठिकाणी पुतळा बसविताना कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची अडचण निर्माण होणार नाही, तसेच वाहतुकीवरही कोणताही परिणाम होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तरीही, पुतळा उभारणीसाठी पोलिस विभागाकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असून, यासाठी प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कुंदन पेंदोर,निखिल मडावी,गौरव कुमरे मनोज वाकटी, विशाल केराम उपस्थित होते. आदिवासी समाज बांधव व स्थानिक नागरिकांमध्ये या विषयाला भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून, प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

12 मार्च रोजी नांदेपेरा चौफुलीवर असलेल्या क्रांतिवीर बापूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला वणी शहराच्या नगराध्यक्ष विद्याताई सचिन आत्राम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते.












