आज बोटोनी येथे सत्यपालची सत्यवाणी.

0
165

आज सत्यवाणीतून सत्यपाल महाराज करणार प्रबोधन
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याचे अनावरण.

आनंद नक्षणे–मारेगाव.

तालुक्यातील बोटोणी येथे उद्या रविवार ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुदेव सेवा मंडळ व पुंडलिकराव साठे यांच्या संयुक्त विद्यमाने विराट पंकज साठे याच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिवसभर विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

रविवार ला सायंकाळी ४ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व रात्री ७ वाजता प्रख्यात सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम

सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश निलेश वासाडे मारेगाव यांचे हस्ते होणार असून उपविभागीय अधिकारी नितिन कुमार इंगोले , तहसिलदार नीलावाड , बि.डी.ओ.मडावी , ठाणेदार खंडेराव , वैद्यकीय अधिक्षक डॉ.इंगळे , सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रविण वनकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here