लावणी नृत्यांगना गौतमी पाटील चे वणीत आगमन, आज तरुणाई थिरकणार, शासकीय मैदानात जबरदस्त तयारी पूर्ण….
राजू तुरणकर–संपादक लोकवाणी जागर
मे.पारसमल प्रेमराज ज्वेलर्स प्रस्तूत टी-१० चॅम्पियन लीग २०२४ टेनिस बॉलचे (क्रिकेट) रात्रकालीन स्पर्धा ह्या वणीच्याच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील क्रिडा विश्वाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे आयोजन वणी येथील शासकिय मैदान पाणीच्या टाकीजवळ करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या औचीत्याणे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकप्रिय लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचे आज सकाळी वणीत आगमन झाले आहे.
या टीममध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील धडाकेबाज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. आज २९ डिसेंबरला रात्री ७ वाजता उद्घाटन सोहळ्याचे प्रमूख आक्रर्षण महाराष्ट्राची सुप्रसिद्ध असलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या उद्दघाटन सोहळ्याच्या व गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन चॅम्पियन लीगचे कार्यकारणीचे अध्यक्ष ॲड कुणाल विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे.