इंस्टाग्राम वरून झाले प्रेम अन्… अडीच महिने.

0
741

धक्कादायक प्रेमाची…. इन्स्ट्राग्रामवर वर कहाणी..

 सोशल मीडियाचा (मोबाईल)  दुरुपयोग ठरत आहे कारणीभूत…

आनंद नक्षणे _ मारेगाव.

प्रेम आंधळं असते असे म्हणतात..ते कुणावर, कसं, केव्हा व कशा माध्यमातून होईल हे हल्लीच्या काळात सांगणे कठीण झाले आहे. ती केवळ आठव्या वर्गात, तो 23 वर्षीय युवक मोबाईल इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमातून ओळख झाली. आपुलकीच्या शब्दांनी दोघात प्रेम फुलले…..तन मनाने बेभान होऊन सर्वस्व  लुटले. ती  गर्भवती राहिली हे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. पोलीस ठाणे गाठले आणि तो गजाआड झाला, ही खळबळजनक घटना मारेगाव तालुक्यातील एका छोट्या गावात घडली.

मारेगाव तालुक्यातील हायस्कुल मध्ये आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचे एका गावातील 23 वर्षीय युवका सोबत इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होत त्यांचे प्रेम बहरत गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. त्याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तीच्या सोबत शारीरिक सबंध प्रस्तापित झाले.
काही दिवसातच तिच्या पोटात दुखू लागल्याने घरच्या लोकांनी तीला वणी येथील डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासणीतून गर्भधारणा झाल्याचे व अडीच महिन्याचा गर्भ पोटात असल्याचे सिद्ध झाले. ही बाब कुटुंबातील प्रमुखांना सांगताच प्रकरण समोर आले

पिडितेला विश्वासात घेताच त्याच्या सहवासातील सर्वच आपबिती कथन केल्यागत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार महाविद्यालयीन तरुणावर पोक्सो 34561(A)376(2)(JN) 506 गुन्ह्यानुसार (अंतर्गत अत्याचाराचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.सदर पिडीत विद्यार्थिनी व संशायित आरोपी तालुक्यातील एका गावात वास्तव करतात.

या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून मोबाईलचा उपयोग कसा जीवन उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरत आहे याचे चिंतन करण्याची गरज प्रामुख्याने विद्यार्थ्यात निर्माण झाली आहे.पुढील तपास ठाणेदार खंडेराव यांच्या मार्गदर्शना खालील पो. उप. डॉ. ज्ञानेश्वर सावंत, शंकर बारेकर पो.हा वा. हे करीत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here