खाती चौक शौचालयाच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढा नागरिकांचा आक्रोश….

0
286

खाती चौक शौचालयाच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढा
नागरिकांचा आक्रोश….

नगर परिषद प्रशासन झोपेत, नागरिकांना अर्ज करून सांगाव लागत अतिक्रम झाले..

राजु तुरणकर – संपादक.

वणी शहरातील खाती चौक मधील नगर परिषद वणी यांच्या मालकीचा सार्वजनिक शौचालय असुन तो जवळपास 4000 चौ.फुट जागेवर व्यापला आहे . हे शौचालय आजतागायत सुरू असून अनेक नागरिक याचा नियमितपणे वापर करीत आहे..
शौचालय च्या चोहोबाजूंनी  मोकळी जागा असुन या जागेवर पुर्व व दक्षिण बाजुने अतिक्रमण झाले असून हे दोन्ही अतिक्रमणे काढून भविष्यात घडणाऱ्या घटनांचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाईच्या प्रतीक्षेत नागरिक प्रचंड आक्रोश करीत नगर परिषद मध्ये पोहचले, नेहमीप्रमाणे मुख्याधिकारी नसल्याने उपमुख्याधीकारी सोनटक्के यांनी अत्यंत जबाबदारीने निवेदन स्वीकारले.

अनुचित घटना घटण्याची नगर परिषद वाट बघणार काय- नितीन धाबेकर.

या ठिकाणी अनेक दाट झाडे झुडपे वाढली असून रात्री चे वेळी महिलांसोबत अनुचित प्रकार घडू शकतात हा प्रकार टाळण्यासाठी वेळीच कारवाई करण्यात यावी या प्रकरणी निवेदन मुख्याधिकारी वणी यांना देण्यात आले आहे. वेळीच कारवाई न झाल्यास होणाऱ्या अत्याचारांच्या पालीका प्रशासन जबाबदार राहील सदर निवेदन नितीन धाबेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी परीसरातील रमेश बावणे संजू चौधरी नितीन वाकळे सुमित वाकळे पंडित धाबेकर राहुल गाताडे संतोष कुरवाडे छोटू सोनटक्के प्रकाश बेले दिनेश खंडाळकर राम बेले निलेश धाबेकर शाम काळे बंटी धाबेकर शंकर कुरवाडे दीपक खंडाळकर कल्पना चौधरी कमल धाबेकर काळेताई सुशीला एकरे बेलेताई सोनुले ताई कल्पना धाबेकर व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here