शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार इनकमिंग.

0
1269

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार इंनकमिंग.

आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाचा प्रभाव, वाढता पाठिंबा.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात विविध पक्षांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील समस्यांचा आवाज विधानसभेत बुलंद करून, आरसीसीपीएल कंपनीत रोजगारांसाठी काढलेला मोर्चा व शेतकर्यांच्या मदतीसाठी पेटवलेल रान , त्यांच्यातील सामान्य माणसाविषयी असलेली तळमळ बघून लाखो लोकांच्या हृदयात त्यांनी घर निर्माण केले आहे. जनतेच्या मुखातून आता नेता असावा असे स्वाभिमानी उद्गार निघत आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्ते निःस्वार्थी आमदार संजय भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत आहे.

आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलजई, तरोडा, बेलोरा परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.गेल्या काही आठवड्यांपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक पवित्रा घेत असून आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या भूमिकेचा थेट परिणाम स्थानिक राजकारणावर होताना दिसत आहे. व जनमानसात त्यांच्या कार्याची जबरदस्त स्तुती होतांना दिसून येत आहे, त्यामुळे ईतर विरोधी पक्षांनी आमदार संजय देरकर यांच्या वाढत्या प्रभावाची धास्थी घेतली असतानाच, झालेला हा पक्षप्रवेश हा सत्ता पक्षाच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मनात प्रचंड आक्रोश असल्याने, सत्ता पक्षासाठी धक्का म्हणून पाहिला जात आहे.या पक्षप्रवेश सोहळ्यात महेंद्र हरी राखुंडे, अनिकेत सुधाकर कुमरे, अमोल गुरुदेव तितरे, अमोल यमपल्लीवार, महेंद्र बावणे, पांडुरंग जेऊरकर, अमोल सोनटक्के, शकीस घिमे, युगल घिमे, सोपान कांबळे, सौरभ आसुटकर यांच्यासह शेकडो  कार्यकर्त्यांनी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिनी शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

आमदार संजय देरकर यांचे  निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख संजय निखाडे, सुधीर थेरे जिल्हा सन्वयक, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, सतीश वर्हाटे, संजय देठे, दिवाकर भोंगळे , विनोद ढूमने , आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकांच्या दारात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्थानिक स्तरावर मोठी बळकटी देणारा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here