चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी..

0
898

वणीत भाजप शासनाच्या विरोधात काळी दिवाळी साजरी.

आमदार संजय देरकर यांनी भर रस्त्यांवर चटणी भाकर खावून दिली शेतकऱ्यांच्या मागण्यांना साद.

राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर 9422673123

वणी मध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यासमोरील चौकात आंदोलन केले. चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी शिदोरी आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या; अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यवतमाळ जिल्ह्यात वणी झरी मारेगाव या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. जाहीर केलेल्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी पूर्वी  जमा करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते, दिवाळी आली परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पूसल्याचे लक्षात येताच शिवसेनेने भाजप सरकारचा धोरणांचा निषेध करीत हे आंदोलन केले.

आमदारांनी भर रस्त्यांवर चटणी भाकर खाऊन केली काळी दिवाळी साजरी.

भाजप सरकारने शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर फसव्या घोषणा करून तोंडाला पाने पुसल्याने सरकारच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास ,शरद ठाकरे, सुनील कातकडे, सुधीर थेरे, गणपत लेडांगे, संतोष कुचनकर, डीमन ताई टोंगे, प्रकाश कराड ,पुरुषोत्तम बुट्टे, बंडु चांदेकर, दिलीप काकडे, ढेंगले गुरुजी, विनोद ढुमणे, राजु तुरणकर, मनिष बत्रा, डॉ जगन जुनगरी, डॉ बोबडे, मोरेश्वर पोतराजे, मनोज धेंगळे, प्रमोद भगत, संजय देठे, भगवान मोहिते, दिवाकर कोल्हेकर, प्रेमानंद धानोरकर, कुंदन टोंगे, टीकाराम खाडे, मोरेश्र्वर उज्वलकर, सतीश भटगरे, अजय चन्ने , दिवाकर सातपुते, राजु लडके,नांदेकर गुरुजी, शत्रुघ्न मालेकर, बंडु देवाळकर, किशोर थेरे, राजु पाटिल, बबन केळकर, सतीश वराटे, रोहित ताजने, एजाज काझी,व अनेक शिव सैनिकांनी चटणी भाकर खावून “काळी दिवाळी” हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here