शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वणी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चेबांधणी..

0
335

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वणी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चेबांधणी..

आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिकात प्रचंड उत्साह, विकासाची हमी…. निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या शिवसैनिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन.

राजू तुरणकर – संपादक.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा बिगुल वाजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) रणसज्ज झाली आहे. वणी शहरात पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक शिवसैनिकांना अर्ज घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, सुधीर थेरे जिल्हा समन्वयक, गणपत लेडांगे जिल्हा संघटक, रवी बोढेकर तालुका संघटक, विनोद ढूमने शहर प्रमुख, राजु तुरणकर संपर्क प्रमुख, मनिष बत्रा शहर संघटक, अजय चन्ने शहर सचिव यांच्या उपस्तीतित बैठक संपन्न झाली. त्यामध्ये सर्व उपशहर प्रमुख, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वरोरा रोडवरील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात वणी नगर परिषद निवडणुक लढणाऱ्या इच्छुकांना अर्ज भरून २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जामध्ये इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक माहिती, सामाजिक व राजकीय अनुभव, पक्षासाठी केलेले उपक्रम, तसेच सोशल मीडियावरील कार्य यासंबंधी तपशील भरावयाचा आहे. आधुनिक राजकारणात समाजमाध्यमांची भूमिका लक्षात घेऊन ही माहिती अनिवार्य करण्यात आली आहे.

राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची छायाप्रत अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अपूर्ण अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व अर्जांची छाननी पक्षाच्या ठरलेल्या निकषांनुसार करण्यात येईल आणि अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल, अशी माहिती वणी शहर प्रमुख विनोद ढूमने – 70200 48505, संपर्क प्रमुख राजू तुरणकर – 9422673123, शहर संघटक मनीष बत्रा 918788678700 , शहर समन्वयक अयुब खान पठाण, आणि शहर सचिव अजय चन्ने यांनी संयुक्तपणे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here