0
77

अतीपावसान सार गेल, कुरई येथे शेतकरी आत्महत्या …

वाढता उत्पादन खर्च आणि मालाला न मिळणारे भाव

ऐन दिवाळीच्या सणाला एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरई येथील शेतकरी शंकर गणपत चटप (36) यांनी दिनांक २० ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० चे दरम्यान आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयानी उपचारा करीता रुग्णालयात चंद्रपूर येथे भर्ती केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोंबर ला रात्री २१ वाजताचे सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशी माहीती मिळाली.

मृतकाचे पच्शात पत्नी शितल शंकर चटप (30), मुलगा अभिनंदन शंकर चरय (5), मुलगी हिमांशी शंकर चटप (3), असा आप्त परिव, आहे.

मृतकाचे कुटुंबात पत्नी शितल शंकर चटप यांचे नावे मौजा गोवारी (पा) येथे गट क्र 58/1 क्षेत्र 1.29 हे. आर. सामाईक जमीन आहे.

शंकर चटप यांनी ऐन दिवाळीच्या सणाला विषारी औषध प्राशन करून आपले जिवन का संपविले? याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.

शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील एक गंभीर समस्या आहे, जिची अनेक कारणे आहेत. वाढती कर्जबाजारी, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे पिकांचे नुकसान आणि शेतमालाला योग्य भाव न मिळणे हे त्यामागील प्रमुख कारणे आहेत.

शेतकरी आत्महत्येमुळे अनेक कुटुंब उध्दवस्त झाली असून त्याचे गंभीर परिणाम समाज व्यवस्थेवर होत आहेत. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय गंभीर मुद्दा असून या समस्येवर  मूळ तोडगा काढण्याची सूचना सर्वोच्य न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजले परंतु ते फारसे प्रभावी ठरले नाहीत. शासनाने केलेल्या उपायातून शेतकऱ्या ऐवजी इतर घटकांचाच अधिक फायदा झाला आहे. शासन एकीकडे कर्जमाफी किंवा आर्थिक मदत जाहीर करते तर दुसरीकडे शेतमालाला योग्य दर मिळत नाही म्हणजेच त्याच्या उत्पनात वाढ होत नाही व पुन्हा त्याला कर्जाशिवाय पर्याय उरत नाही.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here