मारेगांवात परिवर्तन विचाराची दिवाळी.

0
203

मारेगांवात परिवर्तनवादी विचाराची दिवाळी

जिजाऊ पुजन करून जपले महानायिकांचे विचार.

ज्योतिबा पोटे – मारेगांव

दिवाळी सण हा प्रत्येकासाठी आनंददायी व जीवनात सुखशांती मिळावी जीवन भरभराटी यावी यासाठी सर्वत्र दिवाळी मध्ये लक्ष्मीपुजन पुजन करून उत्साहात दिवाळीचा पाच दिवसाचा आनंददायी  उत्सव साजरा केला जातो. आज बदलत्या काळात मारेगांवात दिवाळीचा सण परिवर्तनवादी विचाराने  साजरा करण्याची परंपरा मराठा सेवा संघाच्या विचार कृतीतून गेल्या २० वर्षापासून सुरू असून, या वर्षी अशा प्रकारे महानायिकांच्या प्रतिमेच पुजन मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते प्रकाश कोल्हे यांच्या कुटूंबीयानी आपले प्रतिष्ठान व घरी जिजाऊ प्रतिमेच्या पुजनाने दिवाळी साजरी करून वैचारिक कृतीतून समाजाला एक आदर्श विचार दिला.

त्या बरोबर मराठा सेवा संघाचे विभागिय अध्यक्ष इंजि अनंत मांडवकर, अनामिक बोढे सुधाकर इंगोले, ज्योतिबा पोटे यांनी महामानव महानायिकांचा विचार समाजात जावा यासाठी जिजाऊ पुजनासह सर्व कौटूंबिक धार्मिक कार्यक्रम शिवधर्म पद्धतीने करून खऱ्या शिव विचाराची शिदोरी समाजासाठी दिशादर्शक आहे. भारतीय संस्कृती ही गौतम बुद्ध ते छत्रपती शिवाजी महाराज , संत नामदेव संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम महाराज, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांची विचार परंपरा पोहचविण्याचा मार्ग हा दिवाळी व इतर सणानिमित्य मिळत असून आजच्या धार्मिक द्वेषातुन बाहेर पडण्यासाठी महामानव व महानायिका तसेच संत महात्म्याच्या विचाराचे चिंतन करून अनुकरण केल्यास जीवनात नक्कीच सुख संमृद्धी भरभराटीचे होईल असे या कृतिशील वैचारिक पुजनातून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here