वणी शहराच्या विकासासाठी संजीव रेड्डी बोदकुरवार यांची मुंबई वारी….

0
272

वणी शहराच्या विकासासाठी संजीव रेड्डी बोदकुरवार यांची मुंबई वारी….

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. राजकीदृष्ट्या वारी चर्चेत.

वणी शहराच्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विविध विकासकामांसाठी मुंबईत पाठपुरावा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न, निधी मंजुरी आणि विकास आराखड्याबाबत त्यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

वणी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी बोदकुरवार सातत्याने प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “जनतेला नगर परिषद निवडणूकीत दिलेले वचन पाळण्यासाठी मुंबईवारी केल्याने शब्द पाळणारा नेता” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान,आगामी राजकीय 2026 च्या पार्श्वभूमीवर ही मुंबई वारी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः विधान परिषद प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने या भेटीकडे राजकीय विश्लेषक बारकाईने पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here