0
48

रोमांचकारी अंतिम सामन्यात जन्नत ११ संघ ठरला विजेता.

अकरा लाखाचे प्रथम पारितोषिक

विजेतेपद, टी-१० चॅम्पियन लीग.

डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले पिता पुत्रांच आयोजन.

मातेचा वाढदिवस ठरला ऐतेहासिक…

सर्वोत्तम कामगिरी उत्कृष्ट यष्टीरक्षक प्रकाश खिस्टकर ठरला, तर उत्कृष्ट झेल प्रतीक मत्ते, फलंदाज प्रणव शेंदे ११ सामने ३३४ धावा, उत्कृष्ट गोलंदाज हितेश ठावरी ११ सामने १८ विकेट, मालिकावीर स्वी राजूरकर १२ सामने ३९९ धावा आणि गोलंदाजीमध्ये १८ विकेट, खेळ भावना राखणारा संघ पुरस्कार एम. ब्लास्टरला मिळाला.

वणी शहरातील मैदानावर आयोजित पारसमल चोरडिया ज्वेलर्स द्वारा आयोजित टी-१० चॅम्पियन लीग २०२४ क्रिकेट स्पर्धेत जन्नत ११ संघाने टायगर रोरिंग संघाचा पाच गड्यांनी पराभव करून विजेतेपद मिळविले.

येथील शासकीय मैदानावर संपलेल्या या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना संभा वाघमारे यांच्या टायगर रोरिंग संघाने १० ओव्हरमध्ये सात बाद ९८ धावा केल्या. यावेळी सामनावीर रवी राजूरकरने २५ चेंडूत तीन चौकार व चार षटकारांसह ५७ धावा केल्या, यात चार खेळाडू रनआउट झाले, तर मोइस शेखने दोन, तर प्रतीक मत्तेने एक गडी बाद केला. प्रत्युत्तर देताना जन्नत ११ संघाने नऊ ओव्हर पाच चेंडूत १०२ धावा काढून विजयश्री खेचून आणली. जन्नत ११ ला शेवटच्या दोन चेंडूत तीन धावांची गरज असताना रवी जुनगरीने एक षटकार लागावून स्पर्धेची बाजी पलटून टाकली. या स्पर्धेत आरएनसीसी ११ संघाने तिसरा, तर अग्रो कॉटन ११ संघाने चौथा क्रमांक मिळविला, स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, रंगनाथ अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे, राकेश खुराणा, राजाभाऊ पाथ्रडकर आदी उपस्थित होते. चॅम्पियन लीग कार्यकारिणीचे अध्यक्ष ॲड कुणाल चोरडिया

यांनी विजेता व उपविजेता टीमचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष मनीष गायकवाड, सचिव उमेश पोद्दार, सहसचिव संदीप बेसरकर, प्रचारक पीयूष चव्हाण, सहप्रचारक राजू रिंगोले यांच्यासह सदस्य मयूर घाटोळे, शुभम मदान, किट मॅनेजर तौसीफ खान, क्युरेटर नंदकिशोर रासेकर, सल्लागार संघदीप भगत यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here