स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या कार्यालयासमोर घाणीचे साम्राज्य , दिव्याखाली अंधार
अधिकाऱ्यांचे वागणे म्हणजे ताका पुरती आजी आणि कामा पुरता मामा …
राजू तुरानकर –संपादक लोकवाणी जागर
गावाची कायदा, सुरक्षा, शांतता राखण्याची जबाबदारी असलेल्या व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या कार्यालयाच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने सलग दोन महिन्यापासून पाणी वाहत असल्याने दिव्याखाली अंधारच म्हणण्याची वेळ आली आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व न्याय देवतेचे मंदिर हे सर्व शासकीय विभाग एकत्र असलेल्या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी दादाजी पोटे माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते यांनी लोटांगण, अर्ध नग्न व समाधी आंदोलने केल्या नंतर या ठिकाणी एक सुंदर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.
मात्र मागील दोन महिन्यापासून पाण्याची पाईप लाईन फुटल्याने सातत्याने पाणी वाहून हजारो लिटर पाणी वाया जाऊन अगदी वाहतूक पोलीस शाखेच्या प्रवेश द्वारा समोर घान निर्माण झाली आहे. गावाची कायदा सुरक्षा आणि शांतता व स्वच्छ्ता ठेवण्याची जबाबदारी असलेले सर्व उच्च पदस्थ अधिकारी या परिसरात रोज मिरवत असतात, त्यांना ही गंभीर बाब न दिसावी ही शोकांतिका असून न उलगडणारे कोडे वणी कर जनतेला पडले आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी रोज सर्व पक्षीय पदाधिकारी खादीचे कपडे परिधान करून मिरवत असतात त्यांना सुद्धा ही बाब दिसू नये, एकंदरीत अधिकाऱ्यांना गावाच काही देणं घेणं नाही हे सिद्ध होते. त्यामुळे ते ताका पुरती आजी आणि कामा पुरता मामा असे अधिकारी दुसऱ्यांचे काय भल करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.