मारेगावात पार पडला राजकीय पुढाऱ्यांना धडकी भरवणारा पक्ष प्रवेश सोहळा.

0
881

मतदारसंघात सर्वात नशीबवान मी आहे, कारण मला असंख्य बहिणी आहेत – राजु उंबरकर.

शेकडो महिलांचा पक्ष प्रवेश, राजकीय पक्षांच्या नेत्यांना धडकी भरवणारा….
 पक्ष प्रवेश सोहळा – मारेगाव तालुक्यातील शेकडो महिलाची उंबरककरांच्या नेतृत्त्वाला पसंदी

आनंद नक्षणे-  मारेगाव प्रतिनिधी

मतदार संघात असंख्य नेते आणि मान्यवर आहेत मात्र त्यात सर्वात भाग्यवान मी आहे , कारण मला मतदारसंघांत असंख्य बहिणी आहेत. याची प्रचिती माझ्या प्रत्येक सुखदुःखात आली आहे. तर आजवर झालेल्या सर्व निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे माझ्या माता – भगिनींचे आहे अशी भावूक प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी केले. तालुक्यातील मनसे महिला सेना आयोजित पार पडलेल्या महिला पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. तालुक्यातील आज शेकडो महिलांनी आज उंबरकर यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश घेतला असल्याने काल मारेगाव तालुक्यात राजकीय खळबळ उडवून अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धडकी भरल्याची चर्चा कोर धरून होती.

राज्यात राजकीय पक्षातील नेत्यांची धरसोड वृत्ती सुरू आहे. या राजकीय घडामोडींमुळे विकास कामासाठी कोणत्या नेत्यांचा आदर्श घेत पक्षाची वाट धरावी असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. असे असताना मारेगाव तालुक्यातील महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे, त्यातच आता मनसेत इनकमिंग सुरू झालं आहे. मारेगाव तालुक्यातील सुमारे ६५० – ७०० महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. महिलांच्या पक्ष प्रवेशामुळे मनसेला मोठे बळ मिळाले आहे.

राज्यातील शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी या पक्षातील राजकीय घडामोडी पाहता आता नेमके करायचे काय असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांना पडला आहे. या पक्षातील राजकारण पाहता मारेगाव मधील महिलांनी वेगळी वाट निवडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठींबा दिल्याचे पहायला मिळत आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा पक्ष, महिलांसाठी अनेक उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणासाठी नेहमी कटिबद्ध पक्ष म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला असल्याचं मत यावेळी महिलांनी व्यक्त केलं. आज पार पडलेल्या महिला सेनेच्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात यशस्वी रित्या पार पाडण्यास उज्वला चंदनखेडे, संगिता सोनुले, सिंधू बेसकर, कुंता वाढई, सुषमा ढोके यांनी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल उंबरकर यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.


प्रसंगी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे,महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, रुपेश ढोके, वामन चटकी,फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, सरपंच शुभम भोयर, शहराध्यक्ष चांद बहादे, रोशन शिंदे, उदय खिरटकर,सुरज नागोसे, लक्की सोमकुंवर, वैभव पुरानकर, हिमांशू बोहरा,सिंधु बेसकर, उज्वला चंदनखेडे, वैशाली तायडे, कानडा सरपंच सुषमा ढोके, संगिता सोनुले, शम्म सिध्दीकी, सय्यद इनुस, निखिल मेहता, सचिन जाधव, संस्कार तेलतुंबडे यांच्या सह असंख्य पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते…

राज्यातील राजकीय गढूळ वातावरण पाहता महिला भगिनींनी मनसेत पक्ष प्रवेश केला आहे. मनसे नेहमीच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून स्वयंरोजगार निर्मितीसाठी पाठिंबा देत आहे. यापुढे देखील महिलांच्या न्याय हक्कासाठी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायम कटिबद्ध असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here