रेती उत्खनन प्रकरण कर्तव्यात कसूर —- ठपका.
कोसारा येथील तलाठी शेख निलंबित
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव – वाळू तस्करीसाठी प्रसिद्ध पावलेल्या घाटांपैकी अतिप्रसिद्धीस पावलेला कोसारा घाट, व कोसाऱ्याचे तलाठी शेख यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार उत्तम निलावाड यांनी अखेर तलाठी शेख यांना निलंबित केल्याची घटना तालुक्यात घडली.
एकीकडे तस्करीवर आळा घालण्याचा प्रयत्न करत असताना कर्तव्यदक्ष तहसीलदार कडाक्याच्या थंडीत पाच पाच फुट उंच कपाशीच्या ओळीत पहाटेपर्यंत लपून जीवाची परवा न करता कधी दुचाकीने तर कधी चार चाकी ने वेशांतर करून रेती तस्करीचा छडा लावण्याचा प्रयत्न करतांना रात्रीचा खेळ चालवतात, मात्र अवैध तस्करीला लगाम घालण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची मदत न करता कोसारा सांजा चे तलाठी नजरूल इस्लाम अब्दुल कययूम ( शेख तलाठी ) हे तस्करीबाबत सैलपणा आणत असून कर्तव्यात कसूर करत असल्याचा ठपका ठेवत शेख तलाठी यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशाने महसूल विभागातील सुस्त कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. इतरही कर्मचाऱ्यांना समज देत सर्वांनी कर्तव्यात कसूर केल्यास अशीच कारवाई होत राहील. तसेच जनसामान्याचे काम होत नसेल किंवा कर्मचारी होत असलेली कामे करण्यात हयगय करत असेल तर जनतेने थेट माझ्याशी संपर्क साधावा असे कर्तव्यदक्ष तहसीलदारांनी काही आठवड्यापूर्वीच पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तालुक्यातील कोसारा येथील वर्धा नदीच्या पात्रात असलेला घाट लिलाव होण्यापूर्वी तस्करांचे चांगलेच फावले होते. यात शासनाच्या महसुलाचा विचार न करता तस्करांना मुभा देण्याचा ठपका तलाठ्यावर होता.
विशेष बाब की नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गौण खनिज उत्खनन कारवाईसाठी सहाय्यक म्हणून शेख तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही सोबतच मुख्यालयी नं राहणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे, प्रशासकीय सेवेतील कर्तव्याचा भंग करणे अशा कारणांचा ठपका ठेवत तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला.
अहवालाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांनी तलाठ्यास निलंबित केल्याचा आदेश दिला आहे.
तालुक्यात रुजू झाल्यापासून गौण खनिज तस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करत तहसीलदार उत्तम निलावडे यांनी तालुक्यात दबदबा निर्माण केला आहे.