उच्च माध्यमिक शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार…..
वाढीव टप्पा मिळेपर्यंत पेपर न तपासण्याचे आवाहन.
आनंद नक्षणे – मारेगाव.
1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव टप्पा वाढ मिळेपर्यंत अंशतः अनुदानित शिक्षक तथा प्राध्यापकांचा इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार राहील या संदर्भातले निवेदन शिक्षक समन्वय संघाने गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव तथा तहसीलदार यांना दिलेले आहे.
अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा यासाठी वेगवेगळ्या संघटनांमार्फत मुंबई येथील आझाद मैदानावरती आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला मागे आश्वासन देऊन थांबवण्यात आले होते.परंतु नंतर या आंदोलनाची कोणतीही दखल न घेता पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा मुंबई येथे शिक्षक संघटनांकडून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यस्तर जिल्हास्तर तथा तालुकास्तरावरील सर्व शिक्षकांनी तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांनी बारावीच्या तसेच दहावीच्या परीक्षेच्या पेपर तपासणी वरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भातली निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरक,र तहसीलदार मारेगाव उत्तम निलावाड आणि गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांना दिले.
एक जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा तसेच दरवर्षी वाढीव टप्पा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदन राज्य समन्वयक पुरुषोत्तम येरेकर यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोबडे, तालुका सचिव संदीप देरकर,भारद्वाज निखाडे, प्रमोद कावडे, दिलीप मांडवकर, योगेश वेले,आनंद गोहोकर, सतीश सांगोले, प्रवीण हेपट, निलेश जाधव यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.