मारेगावात मैत्री कट्ट्याचा स्त्री शक्ती जागर.

0
129

मारेगावात महिलादिनी शेकडो महिलांचा सत्कार

मैत्री कट्टा द्वारे शहरात स्त्री शक्तीचा जागर.

आनंद नक्षणे – लोकवाणी जागर मारेगाव, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मारेगाव मैत्री कट्टा गृप तर्फे सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा तीन दिवसीय कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.यात शेकडो महिलांना भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या निमीत्याने तीन दिवसांचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आठ मार्च ला शेतकरी सुविधा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात
विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या 600 महिलांना साडीभेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पोल्हे सर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष इंदू किन्हेकर, बिना दुपारे हेपट, उदय रायपुरे, दुष्यंत जयस्वाल उपस्थित होते.
९ मार्च ला शनिवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातुन अभिवादन करून विविध राज्यांतील लोकनृत्य सादर करीत शोभायात्रा काढण्यात आली. किरण देरकर संध्या पोटे यांनी फुगे उडवुन कार्यक्रमाची सुरुवात केली. तर
१० मार्च ला३० वर्षा वरील महिलांसाठी समुह व एकल नृत्य स्पर्धेचे उद्घाटन प्रतिभा ताई धानोरकर तर श्री संजय भाऊ खाड़े शामा दिदी तोटावार यांच्या उपस्थितीत करण्यात आले . समुह नृत्य स्पर्धेत प्रथम अंबे गृप दिव्तीय आम्रपाली गृप तर तृतीय जिल्हा परिषद शिक्षक गृप आला .एकल नृत्य स्पर्धेत प्रथम मेघा मड़ावी दिव्तीय‌ रचना किनाके तृतीय प्रियंका घाने आली. याप्रसंगी विविध क्षेत्रात उलेखानिय कार्य करणाऱ्या डॉ विनोद आदे ,कु शुभांगी मुंघाटे,समीर सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक जुनेजा प्रतिभाताई डाखरे ,किशोर पाटील,गजानन जयस्वाल, मिलिंद डोहणे यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here