काँग्रेसच्या मायावी रूपा पासून सावध राहा :- सुधीर मुनगंटीवार

0
522

कांग्रेस च्या मायावी रुपापासून सावध राहा !- सुधिर भाऊ मुनगंटीवार

वणीत भाजपा कार्यकर्ता मेळावा संपन्न, विजयाची निर्धार मूठ…

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर. 

भारतीय जनता पार्टीने चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभेच्या सार्वञीक निवडणुकीकरीता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल केली. उमेदवारी प्राप्त होताच प्रचाराचा झंझावात सुरु करण्यात आला आहे. येथील विनायक मंगल कार्यालयात गुरुवारी दि. २१ मार्च ला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी त्यांनी कांग्रेस च्या मायावी रुपापासून सावध राहण्याचा इशारा देत विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली तर पत्रपरिषदेत कांग्रेस ने केलेली ५० वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुवावी लागेल म्हणत विरोधकांच्या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले.

आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात वणी मतदार संघातील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती.
व्यासपिठावर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. मदन येरावार, आ. प्रा. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, विजय चोरडिया, संजय पिंपळशेंडे व सर्व  पदाधिकारी, जनप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.
याप्रसंगी चंद्रपूर वणी ,आर्णी लोकसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना विविधांगी मार्गदर्शन केले. “अब की बार चार सौ पार” करत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा मानस व्यक्त केला. तर विरोधकांच्या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले.

50 वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुतोय….!.

पत्रपरिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी कॉग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर चोहोबाजूंनी प्रहार केला. शेतकरी आत्महत्या यापुर्वी सुध्दा झालेल्या आहेत. कृषीमंत्री शरद पवार असतांना ही आत्महत्या झालेल्या आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्महत्या थांबाव्या याकरीता प्रयत्न करताहेत. मात्र कॉग्रेसी नेत्यांनी सांगाव तुम्ही पन्नास वर्षात काय केले. ही पन्नास वर्षाची घाण आहे याला चार पाच वेळा धुवावे लागेल आम्ही तिसऱ्यांदा धुतोय असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here