किशोर केळझरकर वरोरा यांना पितृ शोक
नत्थुजी गणपत राव केळझरकर यांचे निधन…
लोकवाणी जागर वृत्त….
धोबी परीट सर्व भाषिक महासंघाचे चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष किशोर केळझरकर वरोरा यांचे वडील नत्थुजी गणपत राव केळझरकर यांचे आज दिनांक 27 मार्च ला तबीयत बिघडल्याने वर्धा सेवाग्राम येथे उपचारासाठी नेत असताना भूगाव जवळ हृदविकाराच्या तीव्र झटका आल्याने निधन झाले, ते 65 वर्षाचे होते. ते मुळ कावडी गोवारी येथील रहिवासी असून ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा विशेष कार्यकारी अधिकारी होते. तसेच माजी मंत्री संजय देवतळे यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते.
त्यांचे पार्थिवावर वरोरा ( बोर्डा) येथे त्यांचे राहते घरी आणले असून उद्या 28 मार्च 24 ला सकाळी 11 वाजता बोर्डा मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंड, व बराच मोठा आप्त परिवार आहे.
मृतकाच्या आत्म्यास चिरशांती लाभो व केळझरकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो . लोकवाणी जागर परिवार तर्फे व धोबी समाज सर्व भाषिक महासंघाचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.