अवैध रीती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त, तहसीलदारांची धडक कारवाई.

0
230

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, तहसीलदार नीलावाड यांची धडक कारवाई.

मारेगाव महसूल विभागाच्या कारवाईने रेती तस्कर धास्तावले…

लोकवाणी जागर वृत्त 

मारेगाव : तालुक्यातील कानडा परिसरात ट्रॅक्टरने अवैध रेती वाहतूक करीत असतांना महसूल विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकत एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई मंगळवारला मध्यरात्री केली. त्यामुळे कमालीचे तस्कर दहशतीत आले आहे.

मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांचे जाळे फोफावले असतांना येथील तहसीलदार उत्तम निलावाड हे स्वतः एक्शन मोडवर येत पथक कार्यान्वित केले. यात मागील दोन महिन्यात अनेक वाहनावर धडक कारवाई करून तस्करांचे मनसुबे हाणून पाडले. त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय सेवेतील पारदर्शकतेच्या मूल्यमापनाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे.

दरम्यान, सातत्याने अवैध रेती तस्करांवर केल्या गेलेल्या कारवाईनंतरही रेती तस्करांची अवैध चोरी कायम असतांना मंगळवारला रात्री कानडा मुकटा पांदण रस्ता येथे मध्यरात्री रेतीचे ट्रॅक्टर अवैध वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच महसूल पथक घटनास्थळी दाखल होऊन जप्तीची दोन वाजता कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अमोल गुघाने, तलाठी शिंगणे, कुडमेथे, सोयाम, मडावी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here