लालपुलीया परिसरातील एफ. सी.आय च्या कोल डेपोतील करोडोचा कोळसा जळून खाक.
आग विझता विझेना, सर्व प्रयत्न व्यर्थ.
राजू तुरणकर – संपादक.
लालपुलीया परिसरातील (FCI) फुल कॉरपेरेशन ऑफ इंडियाच्या कोलडेपोतील कोळशाला चार दिवसांपुर्वी आग लागली. यात दहा हजार टनाच्या आसपास कोळसा जळून खाक झाला, अजूनही कोळशाच्या ढिगार्यामध्ये प्रचंड आग धगधगत आहे.
लालपुलिया परिसरात फार मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचे डेपो आहेत. कोळशाला आग लागणे, कोल डेपो धारकांना नित्याची बाब आहे, उन्हाळयाच्या दिवसात कोळशाला लवकरच आग लागते, कोळसा हा ज्वलनशिल पदार्थ असल्याने कोलडेपो धारक सातत्याने ही आग वीजवून कोळसा पसरवून त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने आगीवर नियंत्रण करीत असतात. 26 मार्च रोजी वातावरणात बदल होवून थोड्या प्रमाणात पावसाच्या सारी आल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठा असलेल्या ढिगार्यात लागून असलेली आग वरून पडलेल्या पावसाने आतमध्ये गॅस पकडल्याने आतून आगीने रौद्ररूप धारण केले आणि पूर्ण ढिगारे जळून खाक होत आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
चार दिवसापासून अग्निशमन दलाच्या व शेकडो पाणी टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी FCI कडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत आहे व व अजूनही कोळशाचे साठे पेटतच आहे. प्रशासनाकडून सहकार्य मिळत असून कोल आग लागणे ही नैसर्गिक बाब असून आमचे कंपनीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे : श्याम शर्मा मॅनेजर FCI