अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
मारेगाव महसूल विभागाची कारवाई.
आनंद नक्षणे – मारेगाव
मारेगाव तालुक्यातील अवैध रेती तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महसूल विभाग कायम ॲक्शन मोडवर असताना काल मध्यरात्री एका ट्रक वर 2 वाजताच्या सुमारास महसूल पथकाने कारवाई केली. या कारवाईने रेती तस्करा मध्ये खळबळ उडाली आहे.
मारेगाव तालुक्यातील अवैध मार्गाने होत असलेल्या रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेक कारवाया झाल्या आहेत. दरम्यान, पिसगाव येथे तलाठी उपाध्ये हे गस्तीवर असताना यावेळी रेती वाहतुक करणारा ट्रक क्र. (MH -29 B E 7171) हा रेती वाहतूक करताना आढळून आले.
यावेळी वाहन चालकाकडे कागदपत्रांची तफावत दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली. ट्रक मध्ये 3/4 ब्रास रेती असून पथकाने रेती सह ट्रक ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई केली. आणि ट्रक तहसिल कार्यालय येथे जमा केला असून सदर कारवाई तलाठी उपाध्ये व वाहन चालक कनाके यांनी केली.