वेगळ्या विदर्भासाठी वणीत, नागपूर कराराची होळी

0
148

वणीत विदर्भवादी आक्रमक, नागपूर कराराची केली होळी.

राजू तुरणकर- वणी.

विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव, झरी
तालुका जि.यवतमाळच्या वतिने, विदर्भावर अन्याय करणा-या नागपूर कराराची छ.शिवाजी महाराज चौक,वणी येथे होळी करण्यात आली.२८सप्टें.१९५३ साली नागपूर करार करुन, प.महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांनी विदर्भाला महाराष्ट्रात सामिल करुन,१ मे १९६० साली, विदर्भासह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली.एकूण ११ कलमी असलेल्या या करारात काही महत्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्यात की, त्यामूळे विदर्भाचा सर्वांगिन विकास होईल, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात निर्माण होणा-या सरकारी नोक-या व इतर सुविधांमध्ये विदर्भाच्या जनतेला लोकसंख्येच्या आधारावर २३% वाटा मिळेल.असे अपेक्षित होते,परंतू विदर्भाला पाने पुसण्यात आलीत. सर्वच क्षेत्रात अनुशेष निर्माण झाला.या करारामूळे विदर्भाची फसगत करण्यात आली, त्यामूळे या कराराची होळी करण्यात आली. आता आम्हाला महाराष्ट्रात अजिबात राहायचे नाही,त्यासाठी आम्हाला आमचे विदर्भ राज्यच हवे.

राज्य निर्मितीसाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा विदर्भात असतांना, विदर्भाचे राज्य नाही. विजनिर्मिती, जलजंगल, खनिजे, सुपिक जमिन हे सर्व असतांना येथल्या तरुणाच्या हाताला काम नाही, त्यामूळे नक्सलवाद, बेरोजगारी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या, प्रदुषन अनुशेष व इतरही समस्या निर्माण झाल्या.त्यामूळे विदर्भावर अन्याय करणा-या या नागपूर कराराची होळी करण्यात आली, यावेळी प्रा.पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,  राहुल खारकर, प्रा.बाळासाहेब राजुरकर, मुख्या. नामदेव जेनेकर, संजय खाडे, राजू पिंपलकर, प्रविण खानझोडे, एड.रुपेश ठाकरे, संजय चिंचोलकर, अमित उपाध्ये, प्रमोद खुरसने, धीरज भोयर, अलकाताई मोवाडे, निलिमाताई काळे, अनिल गोवारदिपे, राकेश वराटे, देवराव पा.धांडे, दशरथ पाटील, होमदेव कनाके, देवा बोबडे, रामदास पा.पखाले, प्रभाकर उईके, मारोती मोवाडे, भाऊराव लखमापूरे, विठ्ठल हेकाडे, व्हि.बि.टोंगे यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
समितीच्या वतीने३० सप्टे.२०२३रोजी स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करुन आष्टी-आर्वि-तळेगाव-कौंडण्यपूर अशी पदयात्रा करुन, २ऑक्टो.२०२३ला, दु.१ वा.”विदर्भ संकल्प महिला मेळावा”आयोजित करण्यात आलेला आहे, तरी जिल्ह्यातील कार्यकर्ते व विदर्भप्रेमी जनतेने जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.पुरुषोत्तम पाटील(यवतमाळ जिल्हाध्यक्ष),राहुल खारकर (विदर्भ सचिव), राजू पिंपळकर, (यवतमाळ जिल्हा समन्वय) प्रा. बाळासाहेब राजूरकर, निलिमाताई काळे, अलकाताई मोवाडे, कलावती क्षिरसागर आदीनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here