लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला करू मतदान.

0
302

भारतीय नागरिक असल्याचा अभिमान बाळगूया, चला मतदान करूया…. 

सर्व कामे बाजूला सारून,  मतदान करण्याचे लोकवाणी जागर चे आवाहन.

राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.

निवडणुकीत मतदान करत नसाल तर सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मतदानापासून पळ काढणाऱ्यांना सुनावले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत निरुत्साह टाळण्यासाठी सरकारने अनेक माध्यमातून जनजागृती करून , मतदान करण्याच्या अनेक सुविधा प्रथमच सरकारने निर्माण करून दिल्या आहेत. त्यामुळे आज होवू घातलेल्या लोकशाही उत्सवात सहभागी होवून आपले चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या योग्य उमेदवाराला मतदान करून नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मतदानाचा अधिकार कोणाला?

भारताची राज्यघटना सर्व सज्ञान म्हणजेच 18 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार देते. मात्र, हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं आवश्यक आहे.

मत देण्याचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना आहे. म्हणजेच जी व्यक्ती भारताची नागरिक नाही ती मतदान करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि तुमचं नाव मतदार यादीतच नसेल, तरीही तुम्ही मतदान करू शकत नाही.

निवडणुकीसंबंधी गुन्हा किंवा गैरवर्तनप्रकरणी एखाद्या व्यक्तीला अपात्र घोषित करण्यात आलं असेल, तर ती व्यक्ती मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकत नाही किंवा मतदानही करू शकत नाही.

मतदान करण्यासाठी साठी 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक.

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

1 मतदान ओळखपत्र 2. पारपत्र (पासपोर्ट)  3. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) 4. केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र.5 बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक.6 पॅन कार्ड .7 राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड.8 मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र.9  निवृत्ती वेतनाची दस्तावेज. 10 संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र . 11 आधार कार्ड.12 कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड यापैकी कोणतेही एक ओळख पत्र असल्यास मतदानाचा हक्क बजावता येईल. तरी सर्व नागरिकांनी मतदान करून आपण कर्तव्यदक्ष नागरिक आहात,  हे सिद्ध करण्याचे आवाहन लोकवाणी जगार  तर्फे करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here