पीकउप व दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार.

0
379

दुचाकीस्वाराला पीकअप ची समोरून धडक, इसम जागीच ठार.

टायर फुटल्याने अनियंत्रित झाल्याने अपघात.

आनंद नक्षणे – मारेगाव

विरुद्ध दिशेने येजा करणाऱ्या पिक अप वाहन व दुचाकीची जबर धडक होवून मोटार सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारला संध्याकाळी 8 वाजताचे सुमारास राज्यमहामार्गांवर विनायक कोटेक्स जिनिंग मारेगाव जवळ घडली.

वणी वरून पिकअप वाहन क्रमांक एम एच 29 बी ई 6629 यवतमाळ दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्प्लेंडर क्रमांक M H 31 AS 2579 दुचाकीला पिकअप वाहनाचा टायर फुटून अनियंत्रित होत दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार याच्या डोक्याला जबर मारच नाही तर डोक्याचा अर्धा भाग काही फुटावर पडून चेहरा पूर्णतः चेंदामेंदा झाल्याने तो जागीच गतप्राण झाला.

दरम्यान, अपघातातील मृतक हा नरसाळा येथे गिट्टी क्रशरवर चालक म्हणून कार्यरत होता. मृतक मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील रविदास हरिदास कोरझरे नरसाळा येथील गिट्टी क्रेशरवर ड्रायव्हर आहे. पश्चात पत्नी व दोन मूले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here