पावसाळ्यापूर्वी वणी – उकणी रस्त्याचे काम करण्याची संजय खाडे यांची मागणी.

0
216

उकणी- वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा – संजय खाडे यांचा इशारा

पावसाळ्यात चिखल साचून रस्ता होतो बंद होवून उकणी वासीयांना वर्दळी साठी सहन करावा लागतो नाहक त्रास…

लोकवाणी जागर वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्याने हा रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणी वासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामु़ळे शनिवारी  11 मे रोजी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी वेकोलि अधिका-यांची भेट घेत याबाबत चर्चा करून निवेदन दिले.

वेकोलिने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले. मात्र हे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा फटका उकणी वासीयांना बसत आहे. पाऊस आल्यावर या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असून यात चारचाकी वाहने फसत आहेत. ही वाहने बाहेर काढण्यात चालकांना चांगलीच कसरत करावी लागते व इतर लोकांची मदत घ्यावी लागते.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. या नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. त्यामुळे वेकोलिने सबंधित ठेकेदाराला पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामाची गती वाढवून युद्ध पातळीवर काम पूर्ण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

वेळेत काम पूर्ण न केल्यास आंदोलन…

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाला सुरुवात होते. रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. उकणी येथील रहिवासी नेहमीच शिक्षण, काम, नोकरी, व्यवसाय यासाठी वणीला येतात. वेकोलिने सदर बाब गांभीर्याने घेवून पक्का रस्ता बनवून दिला नाही तर, वेकोलि विरोधात गावक-यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा संजय खाडे, संचालक कापूस पणन महासंघ यांनी दिला आहे.

निवेदन देते वेळी,प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, संदीप कांबळे, बंडू खिरटकर, राजू चिंचोलकर, रोशन देरकर , जीवन मजगवळी, किसन पारशिवे, मनोज खाडे , निलेश हिरादेवे, स्वप्नील गोवारदिपे, अजय खाडे यांच्यासह उकणी येथील रहिवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here