चोरीच्या उद्देशाने चौकिदाराची हत्या प्रकरणात आरोपींना पकडण्यात वणी पोलिसांना यश…
पळसोनी फाट्यावरील बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपी वणी पोलिसांना गवसले. Cctv फुटेज बनले आरोपिसाठी कर्दनकाळ.
राजू तुरणकर – संपादक.
पळसोनी फाट्यावर खिवांसरा यांच्या गोडावून वरील चौकीदाराची चोरीच्या उद्देश्याने हत्या केली होती.या प्रकरणात वणी पोलिसांनी कसून तपास करीत चौकिदाराचा खून करणाऱ्या खुनी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याचे यवतमाळ येथे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
घटनेदरम्यान आरोपी विरोधात कुठलाही ठोस पुरावा हाती न लागल्याने पोलिसांना तपास करतांना, तपासाचे धागे जुळत नव्हते, घटनेच्या तब्बल 18 दिवसानंतर पोलिसांना यश मिळाले आणि आरोपी अजीम शाह रमजान शाह (35) रा. कलंदरी मस्जिद जवळ कारंजा (लाड),मोहम्मद उमर अब्दुल गणी (36) रा. सरकारी दवाखान्याजवळ कारंजा (लाड) व एक विधी संघर्षग्रस्त आरोपीला अटक केली आहे.
वणी मारेगाव मार्गावर पळसोनी फाट्यावर योगेश ट्रेडर्स यांचे सिमेंट व सळाख गोदाम वर असलेल्या चौकीदाराचा 28 एप्रिल चे मध्यरात्री अज्ञात चोरट्याने खून करून लोखंडी सळईचे 4 बंडल चोरले होते. चोरी व खून प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी वणी, मारेगाव, मुकुटबन इत्यादी रस्त्याचे शंभर चे वर सीसीटिव्ही फुटेज तपासले. उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे व ठाणेदार अनिल बेहराणी यांनी सदर गुन्हा गांभीर्याने दखल घेवून, सातत्याने रात्रं दिवस तपास करतांना अनेक संशयास्पद गोष्टींचा उलगडा करताना cctv फुटेज मधील एका गाडीच्या ड्रायव्हर च्यां संशयास्पद वागणुकिवरून पोलिसांना संशयाची सुई गवसली आणि तपासाला अखेर यश आले..
या प्रकरणात वणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांना फार मोठे आवाहन ठरलेल्या खुनाचा तपास तपास लागणे हा फार मोठा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अखेर घटनेच्या तब्बल 18 दिवसानंतर घटनेचा उलगडा करून आरोपींना पकडण्यात वणी पोलीस प्रशासनाला यश आले. आरोपी अजीम शाह रमजान शाह याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्रीचा धंदा असून त्याच्यावर कारंजा व नागपूर येथे अनेक गुन्हा दाखल आहे. आरोपी गोदामा बाहेर उघड्यावर ठेवून असलेल्या लोखंडी सळई बंडल चोरत असताना चौकीदार जीवन विठ्ठल झाडे याला जाग आली व त्यांनी चोरट्याचा विरोध केला. यामुळे आरोपीने चौकिदाराच्या डोक्यावर व पोटावर लोखंडी रॉडने प्रहार करून जिवानिशी ठार केल्याचे पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ पवन बनसोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक, वणी ठाणेदार अनिल बेहेरानी, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि बलराम झाडोकार, धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, अश्विनी रायबोले, रामेश्वर कांडुरे, पोहेकॉ सुहास मंदावार, विकास घडसे, विजय वानखडे, सुधीर पांडे, योगेश डगवार, पोना पंकज उंबरकर, अमोल अन्नेरवार, अविनाश बानकर, निलेश निमकर, पोकों शाम राठोड, विशाल गेडाम, मोहमंद वसीम, रितेश भोयर, अमोल नुन्नेलवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी केली.