गोकुळ नगर मध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

0
185

गोकुळनगर येथील नाली व चेंबरचे काम करण्याची उबाठा शिवसेनेची मागणी.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात, चेंबर फुटल्याने अपघात होण्याची शक्यता.

दोनदा निवेदन देवून नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा

राजू तुरणकर – संपादक.गोकुळनगर( सरोदे मोहल्ला) वणी येथे सांडपाणी रस्त्यावर येऊन जागोजागी घाण निर्माण झाली, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून. यासंदर्भात अनेकदा नगर पालिका प्रशासनाला निवेदन देवून  सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष केल्याचां स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. नाली बांधकाम तसेच चेंबर दुरुस्ती साठी गोकुळ वासियांकडून नगर पालिकेला निवेदन देवून तात्काळ बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नाल्यांचे काम अजुनही होणे बाकी असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्या जाते आहे. सोबतच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. गोकुळनगर येथील सुनिल रामप्रसाद साळुंके यांचे घर ते अविनाश मारोतराव बुधकोंडावार यांचे घरापर्यंत भुमीगत नालीचे काम होणे अत्यंत आवश्यक असल्याचे ,सोबतच सुनिल भोयर व संजय भोयर यांच्या घरासमोरील नाली येथील प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहितीसाठी सोबत फोटो जोडल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

त्या सोबत ज्या भुमीगत गटारांचे काम झालेले आहे, त्यावरील चेंबर निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ते चेंबर फुटलेले आहे.  नागो किराणा जवळील चार चेंबर, भगवान काकडे यांचे घराजवळील चार चेंबर, राजु घोगरे यांचे घराजवळील दोन धापे फुटल्यामुळे तिथे लहान मुले पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. फूटलेले सर्व चेंबर त्वरीत बदलुन देण्यात यावे अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेस नगर परिषद प्रशासन जबाबदार धरले जाईल, तेव्हा वरील मागण्यांचा सहानुभुतीने विचार करून मागण्या त्वरीत पुर्ण करण्याची मागणी उबाठाशिवसेना गटाचे विभाग प्रमुख तुळशीराम काकडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here