कलियुगातही इमानदारी कायम असल्याचा वणीत आला प्रत्यय..
प्रेस करण्यासाठी टाकलेल्या कपड्यात गुंडाळून आले आठहजार… नरेंद्र ने दाखविली इमानदारी…
आनंद नक्षणे – लोकवाणी जागर वृत्त.
इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले आठ हजार रुपये विठ्ठलवाडी येथील चालकाने लालच व मोह न बाळगता, सर्व रक्कम मालकास प्रामाणिकपणे सुपूर्त केलेे असूूून त्यांच्या प्रामाणिकपनाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विठ्ठलवाडी येथील पथाडे सर यांनी इस्तरी करण्यासाठी आपली कपडे येथील श्री संत गाडगेबाबा लाँड्रीचे संचालक नरेंद्र क्षीरसागर यांच्याकडे शनिवारी (ता.18) दुपारी देवून कपडे उद्या देण्याची मागणी करुन निघून गेले.
दरम्यान इस्त्री करण्यासाठी नरेंद्र क्षीरसागर यांनी सदरचे कपडे हातात घेवून पाणी मारत असतांना प्यांटाच्या खिश्यात पैसे आढळले. यावेळी नरेंद्र यांनी क्षणाचाही विचार व लालूच मनात उत्पन्न होवू न देता याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या आई श्रीमती कलावती क्षीरसागर व समाजसेवक राजू तुरणकर यांना दिली. बोलावत घडलेल्या प्रकाराची माहिती देत सदरची रक्कम मालकांस परत देण्याची इच्छा व्यक्त केली. मग त्यांनी कपडे मालक पथाडे सर यांना काल ( रविवारी) संध्याकाळी येवून पैसे परत घेवून जाण्यास सांगितले. पैसे परत केले यावेळी महाराष्ट्र धोबी परिट सर्व भाषिक महासंघाचे विदर्भ महासचिव राजू तुरानकर, श्रीमती कलावती क्षीरसागर विदर्भ महिला सचिव, नितीन बिहारी जिल्हा युवा उपाध्यक्ष, विनोद शिरपुरकर जावई, लेडांगे सर उपस्थित होते.
पथाडे सर यांनी लाँड्री चालकाचे प्रामाणिक पणा बद्दल कौतुक करीत आभार व्यक्त केले. या प्रकाराबाबत संपुर्ण वणी परिसरातुन लाँड्री मालक यांचे कौतुक होत आहे. यावेळी धोबी समाज मित्र मंडळ वणी यांचे तर्फे नरेंद्र क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
यापूर्वीही नरेंद्र क्षीरसागर यांच्या लाँड्रीत इस्तरीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये चुकुन ग्राहकांचे सोने व पैसे आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यावेळीही त्यांनी प्रामाणिकपणे ते परत केलेले असल्याने त्यांच्या प्रामाणिकपणे कौतूक केले तेवढे कमीच आहे…