सोमय्या ग्रुपचा १०० टक्के उत्कृष्ठ निकाल …
मॅकरून ज्यू.कॉलेजचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले….
राजू तूरणकर – संपादक.
वणी:- वडगाव, वणी येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट मॅकरून स्टुडंटस् अकॅडमी ज्यु सायन्स कॉलेजने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. १२१ विद्यार्थ्यांपैकी १२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या निकालात मॅकरून स्टुडंट अकॅडमीचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीतही झळकले हे विशेष.
४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर केवळ ४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट वणी येथील मॅकरून स्टुडंटस् अकॅडमीच्या १२वीच्या ३७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यामध्ये वणी येथील युतिका डांगे या हिने सर्वाधिक ८१.३१ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. तेजस ताजने ८१ टक्के, युरिका हंसकर ८० टक्के, यश केळझरकर ७०.५० टक्के तसेच गौरी गोहोकर ७७ टक्के, कपिल लडके ७३ टक्के व हर्षिता गुर्रम हिने ६८ टक्के गुण पटकावले आहेत. सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियूष आंबटकर, डायरेक्टर अंकिता आंबटकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत उज्वल भविष्याचा वाटचालीकरीता शुभेच्छा देत वणीकर जनतेच्या मायक्रोन स्टुडंट्स अकॅडमी बद्दल असलेला विश्वास व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.