वर्धा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू , उन्हाळ्याची मौज बितली जीवावर…
आनंद नक्षणे – मारेगाव.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदी तलावात पोहायला जाण्याचे अनेकजण पसंद करत असतात. त्यानुसार काही मित्र वर्धा नदीत पोहण्यासाठी गेले असताना यात एकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची आज दि.२६ मे रोज रविवार रोजी दुपारी अंदाजे तिनं वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मारेगाव तालुक्यातील दांडगावातून वाहणाऱ्या वर्धा नदीत बुडून मानव अविनाश राऊत रा. वरोरा वय (15 वर्ष) या तरुणाचा मृत्यू (Death) झाला आहे. गेली आठ दिवसांपासून वातावरणात मोठा उकाडा जाणवत होता. तर अंगाची लाहीलाही होत होती. या उष्णतेपासून सुटका मिळावी यासाठी नदी, तलावात पोहण्यासाठी अनेकजण जात असतात. अशाच प्रकारे मानव राऊत याने मित्रानं सोबत पोहण्याचा बेत आखला. पण त्याच्यासाठी तो आयुष्याचा शेवट ठरला. सर्व मित्र पोहण्यासाठी नदीत उतरत पोहण्याचा आनंद घेत होते.
दरम्यान पोहत असताना वर्धा नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मानव याचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह पाण्या बाहेर काढण्यात आला असून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.