संजय देरकर यांची वणी विधानसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती बद्दल सत्कार समारंभ…
देरकर यांच्या नेतृत्वावर प्रेरित होवून अनेक युवकांनी बांधले शिवबंधन…
राजू तुरणकर – संपादक.
शिवसेना ऊ.बा.ठा शिंदोला शिरपूर सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदोला येथे भव्य सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला, यावेळी परिसरातील ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
वणी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय नेते तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष आदरणीय संजय देरकर यांच्या राजकीय कारकीर्दीची दखल घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदरणीय संजय देरकर यांची वणी विधानसभा प्रमुख पदी महत्वपूर्ण नियुक्ती करीत वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी सभापती पंचायत समिती वणी अनिल राजूरकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिंदोला येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल भाऊ सुरपाम, संजयभाऊ देठे ज्येष्ठ शिवसैनिक वणी, लोकेश्वर बोबडे सामाजिक कार्यकर्ते,प्रीतम बोबडे, मंगलाताई भटवलकर सरपंच चिखली, विठ्ठल बोंडे माजी सरपंच शिंदोला, अनिल झाडे सोसायटी अध्यक्ष चनाखा परमरोह, मयूर बांदुरकर सोसायटी अध्यक्ष येनाडी, महादेव मसे सोसायटी अध्यक्ष कोलगाव नथू गौरकार सोसायटी अध्यक्ष टाकळी कार्यक्रमामध्ये निंबाळा, बोरगाव, ढाकोरी, बोरी,पाथरी गोवारी, परमडोह, शिंदोला, येनाडी कोलगाव, साखरा येथील शेकडो युवकांनी संजयभाऊ देरकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेना उबाठा मध्ये जाहीर प्रवेश केला व पक्षासाठी तन-मन-धनाने काम करेल व वणी विधानसभेवर भगवा फडकवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असे युवकांनी सांगितले कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करतांना संजयभाऊ देरकर यांनी देशाची व महाराष्ट्राची परिस्थिती पाहता फक्त एकमेव पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव व्यक्तिमत्व देशाला व महाराष्ट्राला ह्या वाईट परिस्थितीमधून म्हणून काढू शकते त्याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व युवकांनी पक्षांमध्ये प्रवेश करावा आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करावे शिवसेना ऊबाठा च्या माध्यमातून वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व युवक युवती शेतकरी शेतमजूर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समस्या प्रामुख्याने सोडवल्या जाईल असे आश्वासन विधानसभा प्रमुख संजयभाऊ दरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल राजुरकर यांनी सुद्धा कार्यक्रम स्थळी बोलताना कुठलाही मतभेद न ठेवता शिवसेना पक्षाकरिता एक मताने आणि खांद्याला खांदा लावून आपण सर्व शिवसैनिक म्हणून काम करू असे सांगितले कार्यक्रमाला शिंदोला शिरपूर सर्कल मधील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये एक नवसंजीवनी निर्माण झाली आहे, असे उपस्थित शिवसैनिकांचे मत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र इददे यांनी केले तर आभार प्रदर्शन व प्रास्ताविक श्लोकेश्वर बोबडे यांनी केले सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला.