इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तरुण कामगाराचा मृत्यू.
घटनेने परिसरात हळहळ.
विद्युत सबंधित कामगारांना सावधानता बाळगण्याची गरज….
आनंद नक्षणे – मारेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली. हिवरा (मजरा) गावात वीजेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. घरगुती वेल्डिंगचे काम करत असताना जोरदार विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे विजेचा धक्का लागल्याने निलेश अशोक जरीले (26) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान, निलेश हा गावातीलच बंडू ठावरी यांच्या घरी घरगुती वेल्डिंग चे करत असताना त्यास विजेचा शॉक लागल्याने त्याला तातडीने वणी येथे दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व दोन विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे.
इलेक्ट्रिक संबंधित काम करताना अनेक तरुण रोजगारा पोटी शेतकऱ्यांची गाव गावातील इलेक्ट्रिकचे कामे करीत असतात, यामध्ये यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील इलेक्ट्रिक संबंधित कामगारांनी काम करत असताना या घटनेतून सावधानता बाळगण्याची व निष्काळजीपणे काम करणे जीवावर बेतू शकते ही बाब लक्षात घेवून जनजागृती करणे आवश्यक आहे.