पावसाळ्यात सांडपाण्याच्या नालीचे खोदकाम
नागरिकांचे आरोग्य धोक्यात..
आनंद नक्षणे…
राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मारेगाव शहरात पावसाने हजेरी लावली आहे. जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील नालीचे रस्त्यांवर खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील काही भागात नालीचे खड्डे खोदलेले आहेत. त्यात पाणी साचले आहे. जोराच्या पावसाला सुरुवात झाल्यास रस्त्यावर घाण पाणी येवून वर्दळीच्या आणि स्थानिक लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवून, काही मार्गावर अपघात होण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला असून नगरपंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. व सिमेंट रोडच्या कडेला एन पावसाळ्यात नालीचे खोदकाम केल्याने नागरिक त्रस्त आहेत. तरी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करत आहे.