अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ वणोजा देवी च्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षरोपण.
अवास्तव खर्चाला फाटा देत, सामाजिक उपक्रमातून साजरा केला उत्सव.
आनंद नक्षणे मारेगाव: अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा र.न. (2373) वनोजा देवी यांच्या वतीने आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी अधिष्ठान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच प्रशांत भंडारी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष उपासक पांडुरंगजी देवाळकर, सदस्य बालाजी बरडे, विठ्ठल पिदूरकर, पंढरी धांडे, पांडुरंग ठाकरे, शंकर टोंगे,.गुणवंत डवरे, राजु देवाळकर, भास्कर धांडे, सतीश मिलमिले, संजय महाकुलकर, भूपेंद्र बाटे, दिलीप येसेकर, यासह समस्त गुरुदेव उपासक व गावकरी उपस्थित होते.
आषाढी निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम साजरे होत असताना वनोजा देवी येथील अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने इतरत्र खर्च टाळून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली, हे विशेष..