सामाजिक उपक्रमातून संजय काकडे यांचा वाढदिवस होणार साजरा..
साई पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
राजू तुरणकर वणी.
साई पॉलीटेक्निक, किन्ही (जवादे) या संस्थेच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त समाजकल्याणाच्या दृष्टिकोन सातत्याने डोळ्यासमोर ठेवत कार्य करणारे संजय काकडे यांच्या वाढदिवशी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः आरोग्य शिबिराचे आयोजन करून स्थानिक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिराचे आयोजन साई पॉलीटेक्नीक, सकाळी ठिक ११ वाजता,किन्ही (जवादे), येथे दिनांक १० ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी करण्यात येणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असेल, जी सामान्य तपासणीसह रक्तदाब, रक्तातील साखर, नेत्रतपासणी, हृदयविकार तपासणी इत्यादींची मोफत तपासणी करणार आहे. याशिवाय, गरजूंना आवश्यक त्या औषधांचे व वृद्धांना चष्म्याचे वाटप मोफत वितरणही करण्यात येणार आहे.
शिबिरासोबतच, साई पॉलीटेक्निकने समाज कल्याणासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांचा लाभ स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेचे प्राचार्य श्री. नितीन ठमके यांनी सांगितले की, “साई पॉलीटेक्निक आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नेहमीच समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या प्रयत्नात असते. यावर्षीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले आरोग्य शिबिर आणि अन्य उपक्रम हे त्याचाच एक भाग आहेत.”
सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांना या आरोग्य शिबिराचा आणि इतर उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन साई पॉलीटेक्निकच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयजी काकडे यांनी केले आहे.
संघर्षातून विश्व उभे केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व संजय काकडे.
अनेकांना जीवन जगण्याचे बळ देणारे व सातत्याने सामाजिक हित जोपासत राजकारणासाठी राजकारण नाही तर सर्वप्रथम समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजकारण करणारे व संघर्षमय जीवनातून परिसरातील शून्यातून विश्व निर्माण करणारे एकमेव व्यक्तिमत्व संजय काकडे यांना लोकवाणी जागर परिवार कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
अशा समाज सेवकाची समाजाला गरज…!
निवडणुका येतात जातात परंतु समाजाची सातत्याने चिंता करणारे फार कमी असतात. लोकसभा निवडणुकीनंतर आता अगदी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वांनाच बघायला मिळणार आहे. अनेक राजकीय पावसाळी छत्र्या बाहेर निघतील.
मात्र सत्तेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सुटतात, त्यासाठी जनसामान्यांच्या समस्या शासन दरबारी अगदी रेटून पाठपुरावा करून, ती करून घेण्याची जिद्द संजय भाऊ मध्ये आपणास पहावयास मिळते, वडकी येथील ग्रामीण रुग्णालय असो, पन्नास वर्षांपासून खितपत पडलेल्या पिंपळापुर गावाचा विकास असो, किन्ही (ज) सारख्या दुर्गम भागात करोडो रुपयांचा खर्च करून शिक्षणाची गंगा उभे करण्याचे धाडस म्हणजे आपले जन्म गावाबद्दल असलेले प्रेम व आस्था दर्शविते. राजकारण पैष्या साठी नाही तर गावाबद्दल प्रेम हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत लहान भाऊ प्रफुल यांच्या पत्नीला सरपंच करीत गावाचा विकास करून गावाचा कायापालट केला. पत्नी सौ प्रीती संजय काकडे हिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणून अनेक विकास कामी मार्गी लावले. प्रशासनावर वचक व राजकीय गणिते जुळवित सर्वांसी मधूर सबंध जोपासण्याचे जबरदस्त कसब संजय भाऊला आत्मसात आहे.. अश्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची समाजाला गरज असते. अशी समाजाला पोषक असणारी माणसे जोपासणे समाजाचे सुद्धा कर्तव्य असते. संजय भाऊ आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.