वणीत भरला अभूतपूर्व तान्हा पोळा…. प्रचंड गर्दी…

0
156

तान्हा पोळ्यात गर्दीच गर्दी… वणी शहराच्या इतिहासात अजरामर भव्य तान्हा पोळा संपन्न.

विजय चोरडिया यांनी आयोजित केलेल्या तान्ह्या पोळ्यात संपूर्ण वणीतील बाल गोपाळ एकत्र….

राजू तुरणकर —

पोळा सण अतिशय उत्साहात संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला तसेच लहान मुलांचा ताना पोळा हा सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय आनंदात साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या शेतीचे व शेतात राबराब  राबणाऱ्या बैलाचे कष्टाचे महत्त्व कळावे, हे संस्कार मुलांवर व्हावे म्हणून नंदी बैल  हा उत्सव साजरा केला जातो. तान्या पोळ्या मध्ये लहान मुलं आपला लाकडी नंदीबैल घेऊन मारुतीच्या मंदिरा येथे घेऊन जातात आणि तेथे दर्शन करून आपल्या घरी येतात व घरोघरी जाऊन त्यांना आप्तेष्ट बोजारा देतात ही आपली संस्कृती आहे.

तान्ह्या पोळ्यात उसळलेली अभूतपूर्व गर्दी

मात्र तान्ह्या पोळ्याला आता उत्साहाचे वातावरण मोठ्या प्रमाणात आले असून, आई-वडील पाण्यामध्ये सुद्धा नंदीबैलाची प्रतिकृती असलेल्या लाकडी नंद्याची विविध प्रकारची सजावट करून देखावे करून त्या ठिकाणी येतात आणि जेथे तानापोळा भरविण्यात येतो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीसह त्यांना प्राप्त होतात.

वणी शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक पाच जवळ पोस्ट कॉलनी येथील हनुमान मंदिर येथे दरवर्षी ताना पोळा आयोजित करण्यात येतो व बक्षीस रोख स्वरूपात ठेवण्यात ठेवलेले असतात. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते गरिबांचे दाते व भाजपचे प्रदेश सदस्य व धडाडीचे नेते विजय चोरडिया यांच्या सौजन्याने दहा सायकलीचे बक्षीस ठेवण्यात आले होते यात दोन गट असून दोन्ही गटात बक्षीस देण्यात आली तसेच दहा लकी ड्रॉ काढण्यात आले होते.

भाजपचे विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते त्यामुळे ताना पोळा उत्सव समितीने विजय चोरडिया यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी मंचावर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुवार, प्रवचनकार मुन्ना महाराज, राजू जयस्वाल, प्रा. दिलीप अलोणे, पवन एकरे, संजय खाडे, दिनकर पावडे, स्वाती खरवडे, प्रीती बिडकर व मान्यवर उपस्थित होते.

वणी शहरात आजपर्यंत इतका मोठा भव्य ताना पोळा कधीही भरला नाही व शहरातील इतर ठिकाणी तान्हा पोळा भरत होता मात्र यावेळेस तिथे शुकशुकाट होता आणि विजय चोरडिया यांनी पूर्ण वणीला एका ठिकाणी एकत्र आणले असे मनोगत संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. यावेळी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसा निमित्त उमेश पोद्दार व मित्र मंडळ तर्फे गरजू महिला मीना आनंदराव मोहितकर यांना शिलाई मशीन भेट देण्यात आली. तान्हा पोळा पोस्ट कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, गुरुवर्य कॉलनी, डेपो कॉलनी मिळून आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेत एकापेक्षा एक असे नंदीबैल सजावट, पर्यावरण संदेशनात्मक व विविध देखावे केलेले होते. अ गटात रिधान आसुटकर, अक्षदा देवलकर, कार्तिक लिजबे, गौरवी खुंगर, श्रिवांश मोरे तसेच ब गटात अदिती पाटील, चैतन्य चौधरी, रियांशी पोहाने, रिया शर्मा, वनिका धोंडगे, तेजस्विनी उरकुडे यांनी प्राप्त केले. या स्पर्धेत 590 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी कार्यक्रमाचे संचालन सागर मुने यांनी केले व संपूर्ण जबाबदारीने तान्हा पोळा उत्सवाचे कार्य केले आणि उत्सव उत्तम होण्यासाठी सुमित पदलमवार, अनुप पोटे, सूरज नक्षिने, मयूर जूनगरी, निखिल बोथले, दिनेश झोडे, मयूर खुसपुरे, मनोज राठोड, अनिकेत जूनगरी, आकाश तामगाडगे, पवन नागरकर, निखिल बोथले राजू रींगोले, प्रवीण सातपुते, प्रियंका कोटणाके, वैशाली काशीकर, अभय पारखी, आकाश बोथले, संध्या अवताडे, अमित उपाध्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here