प्रवीण झाडे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष.

0
297

महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी प्रविण झाडे यांची बिनविरोध निवड.

राजू तुरणकर संपादक लोकवाणी जागर वणी  तालुका महाराष्ट्र सरपंच संघटनेची बैठक महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र देवराव कराळे , विदर्भ अध्यक्ष ऍड. देवा पाचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने ॲड. रूपेश ठाकरे सरपंच मुंगोली यांच्या उपस्थितीत  वणी पंचायत समितीच्या बि. आर.जि.एफ. हॉल मध्ये पार पडली. .

या बैठकीत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष तुकाराम माथनकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या बैठकीचे संचालन ऍड. रुपेश ठाकरे यांनी केले.

बैठकीच्या सुरुवातीला तालुक्यातील उपस्थित महाराष्ट्र सरपंच संघटनेचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना मागील जमा खर्च वाचुन दाखवला त्यानंतर वणी तालुका महाराष्ट्र सरपंच संघटनेची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली.

तालुकाध्यक्ष पदी पेटुर ग्राम पंचायतीचे सरपंच  प्रवीण झाडे , सचिव पदी लालगुडा ग्राम पंचायतीच्या सरपंच गिताताई उपरे, कार्याध्यक्षपदी अनिल देउळकर, उपाध्यक्ष पदी – मंगेश काकडे, विद्याताई पेरकावार, कल्पना ताई टोंगे, नागेश धनकसार, तर सरचिटणीस पदी पुजाताई बोढाले, स्वातीताई झाडे, गणेश टेकाम, ज्योती ताई माथुलकर, तर संघटिका म्हणून रंजना बांदुरकर तर सल्लागार म्हणून ऍड.दिलीप परचाके यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी तुकाराम माथनकर , हेमंत गौरकार, प्रकाश बोबडे, राजू इड्डे, निलेश पिंपळकर, अजय कवराशे, गीताताई पावडे,तात्याजी पावडे, परशुराम पोटे, कैलास पिंपराडे, प्रशांत भोग, अरुणाताई जेणेकर यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here