केळापूर आर्णी मतदार संघावर शिवसेना उबाठा गटाचा दावा.

0
228

केळापुर-आर्णी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा ( उबाठा) दावा 

अंकीत नैताम यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांचे साकडे

परवेज खान — केळापूर तालुका प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केळापूर आर्णी विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा ( उबाठा) दावा ठोकल्यामुळे येथील सर्व राजकीय समिकरणे बिघडणार आहे. उबाठाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केळापूर -आर्णी विधानसभा मतदार संघांची जागा शिवसेना या पक्षाला महाविकास आघाडीने सोडावी व पांढरकवडा येथील स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी. यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरदचंद्र पवार व काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी सुद्धा आपला दावा कसा मजबूत आहे हे किशोर तिवारी यांनी समजावून सांगितले आहे. या जागेसाठी त्यांनी मागील २५ वर्षापासून सतत आदिवासी व शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे अत्यंत गरीब मात्र सतत समाजसेवा करणारे युवा आदिवासी कार्यकर्ते, भूमिपुत्र अंकित नैताम यांना शिवसेना उबाठाकडून उमेदवारीची मागणीही केली आहे.

आर्णी “हा मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असुन वणी राळेगावसह केळापूर भागातील आदिवासी व कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. आपल्या हक्काच्या जमिनीशी नाळ जुडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला यावेळी संधी देण्याचा तसेच परीवारवादाला सोडुन आमदार निवडण्याच्या आग्रहाचा आदर महाविकास आघाडीने करावा यासाठी त्यांनी चांगलाच पाठपुरावा केला आहे. शिवसेनेचे ( उबाठा ) उमेदवार अंकित नैताम यांनी सुद्धा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून आपला जनसंपर्क मजबूत केला आहे.

आर्णी केळापूर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर २००४, २०१४ व २०१९ मध्ये काँग्रेस पराभूत झाली आहे . या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने ३१ हजार मतदान घेतले आहे.

कोण आहेत अंकित नैताम…..

अंकित नैताम हे पांढरकवडा नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती होते. सन २०१२ मध्ये त्यांची नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आदिवासी आघाडी या पदावर कार्यरत होते. ट्रायबल फोरम या संघटनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष आहेत. युवा टायगर फोर्स संयोजक या पदावर कार्यरत आहे.

नैताम यांचे मतदारसंघातील कार्य

 क्रांतिवीर बिरसा मुंडा शैक्षणिक ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून केळापूर तालुक्यातील शेतकरी, आदिवासी विधवांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण, कोरोना काळामध्ये सात हजार कुटुंबाना अन्नाची किट घरपोच वाटप केली आहे. गरीब कुटुंबातील महिलांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्त साडी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. रक्षाबंधन सणाला बहिणींना टिफिन डबे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींचे विवाह संस्थेच्या माध्यमातून करणे सुरू आहे. अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here