माझे राजकिय भाग्यविधाता व शिल्पकार जनताच: संजय राठोड

0
180

लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत संजय राठोड यांचे नामांकन दाखल.

माझे भाग्यविधाते व शिल्पकार जनताच : संजय राठोड.

राजु तुरणकर – लोकवाणी जागर 

गुरुवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी दारव्हा येथील झासी राणी चौक, गुल्हाणे मैदानावर संजयभाऊ राठोड यांचा नामांकन अर्ज दाखल मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संजयभाऊ राठोड यांनी उपस्थीतांना आशीर्वाद मागताना माझ्या भाग्याचे खरे भाग्यविधाता, शिल्पकार ही मला मतदानरुपी आशीर्वाद देणारी जनता आहे. साध्या कार्यकर्त्यापासून, आमदार, मंत्री मी केवळ जनतेमुळे झालो, हे कदापी विसरणार नसल्याचे मत व्यक्त केले. समर्थकांच्या सोबत पैदल रॅलीत सहभागी होऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी शिवसेना भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आ.),पि.रि.पा.लहूजी शक्तीसेना व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यासह हजारो समर्थकांच्या सहभागाने निघालेल्या रॅलीतील हजारो मुखातून एकच आवाज निघत होता, ‘संजयभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है‘ चे नाऱ्यांनी परिसर दणाणून गेला होता. तर संजयभाऊ राठोड यांच्या समर्थकांच्या रॅलीने मागील सर्व रेकॉर्ड तोडत नवा इतिहास रचल्याची चर्चा संपूर्ण दिग्रस मतदारसंघासह जिल्ह्यात सुरु झाल्याने ते रेकॉर्डतोड मतांनी विजयी होतील, असा विश्वास समर्थकाकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here