पत्रकारांना बाप्पाच्या आरतीचा मान.

0
77

पत्रकारांना ‘बाप्पा’च्या आरती मान

आनंद नक्षणे प्रतिनिधी/मारेगाव.

गणेशोत्सवामध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून गणेशोत्सव मंडळे एकात्मतेचा आणि समाज प्रबोधनाचा वारसा जपत असतात. त्यातही काही मंडळे वेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम राबवून आपले वेगळेपण सिद्ध करताना दिसतात‌. अशाच प्रकारचे वेगळेपण गोटूल गोपाळांचा “बाप्पा” म्हणून नावाजल्या जाणाऱ्या मच्छिन्द्रा येथील सिद्धिविनायक बाल गणेश मंडळाने दाखवून दिले आहे. सर्वसाधारणपणे गणेशोत्सवातील आरतीचा मान मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर लोकप्रतिनिधी अथवा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्याची गणेशोत्सव मंडळाची परंपरा असते. पण या परंपरेला छेद देत मच्छिन्द्रा येथील सिद्धिविनायक बाल गणेश मंडळाने गणेशोत्सवातील गणपतीच्या आरतीचा बहुमान पत्रकार कुमार अमोल या पत्रकाराला देऊन आपले सामाजिक बांधिलकीतील वेगळेपण दाखवून दिले आहे.

मच्छिन्द्रा येथील सिद्धिविनायक बाल गणेश मंडळाने त्यांना ‘बाप्पा’च्या आरतीचा बहुमान देऊन त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव तर केलाच, शिवाय चौथ्या आधारस्तंभ प्रतिष्ठेचे मूल्य अधिक उंचावले आहे. या कृतीबद्दल सिद्धिविनायक बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष अथर्व सुनील आत्राम, सचिव अनुराग बादल कुमरे, उपाध्यक्ष प्रेम दिलीप घोरपडे, अंशु विठ्ठल परचाके, कृष्णा रविंद्र तोडसाम, वैभव नरेश ताजणे, रितिक परसराम सातपुते, चेतन आत्राम, सुमित मिलमिले, तृप्ती पेंदोर, भूषण आत्राम, पियुष आत्राम, आदित्य परचाके, प्रमोद आत्राम, यांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे.

सिद्धिविनायक बाल गणेश मंडळ, मच्छिन्द्रा येथील गोटूल गोपाळांच्या गणेश मंडळाला ग्राम.लोकप्रतिनिधी भैय्याजी कनाके (पहापळ) यांनी महाप्रसाद म्हणून जिलेबी दिली, तर शिवसैनिक (उबाठा) डॉ मनिष मस्की (मारेगाव) यांनी गणेश प्रसाद देऊन सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. मंडळातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here