कांग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी माझी उमेदवारी — संजय खाडे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांची पक्षाला सोडचिठ्ठी….
संजय खाडे यांचे निवडणुक चिन्ह — शिट्टी…
राजु तुरणकर —– वणी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात विधानसभा हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ऊबाठा गटाच्या वाट्याला गेल्याने संजय खाडे नाराज होत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.
आज निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषदेत आयोजन करुन उमेदवारी कायम असल्याचे सांगून, मनोगत व्यक्त करतांना, तीस वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता असुन आजही लोकमत चा पत्रकार असल्याचे सांगून कुणावर व्यक्तिगत अन्याय केला नाही, अन्याय सहन केला नाहीं. मी शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण मला आहे. वणी हा कांग्रेस चा बालेकिल्ला असलेला मतदार संघ असताना सुद्धा आघाडीने सीट सोडल्याने हा कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे. या अन्यायाविरोधात माझी उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मी आमदार झाल्यास बेरोजगारी, शेतकरी, शैक्षणीक, आरोग्य, महिलांच्या बाबतीत समस्यांना प्रध्यान देवून सोडण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संजय खाडे मनोगत व्यक्त करताना भावूक….
दिल्ली येथे असताना कार्यकर्त्याचा फोन, भाऊ तूम्ही विशाल पाटील होवू शकता हे सांगताना संजय खाडे भावूक झाले होते.
विशाल पाटील योगायोगाने त्याच ठिकाणी भेट झाली आणि त्यांचे निवडणुक चिन्ह शिट्टी होते, आज योगायोगाने मला सुद्धा शिट्टी चिन्ह मिळाले, म्हणजे माझा विजय नक्की होईल अशी खात्री संजय खाडे यांनी व्यक्त करीत माझे जीवन हे जनसेवेच्या समर्पित असल्याचे सांगून निवडून देण्याचे आवाहन केले.
शिवसेना ऊ.बा.ठा. गटासी आज पासून माझा सबंध नाही– विश्वास नांदेकर जिल्हाप्रमुख….
वणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतर्फे शिवसेना गटाचे संजय दरेकर हे अधिकृत उमेदवार आहे. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे संजय खाडे यांनी बंड थोपटल्यामुळे त्यांनी आज अर्ज मागे घेण्याची अपेक्षा असताना, निवडणूक रिंगणात आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून उमेदवारी कायम असल्याचे संदर्भाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात केले होते, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांची उपस्थिती सर्वांना अवाक करून गेली.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना विश्वास नांदेकर यांनी आजपासून माझा शिवसेना ऊ. बा. ठा. गटाशी कुठलाही संबंध नसल्याचे प्रतिपादन केले. यावेळी चंद्रकांत घुगुल झरी तालुका प्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुका प्रमुख व मारेगाव तालुका प्रमुख संजय आवरी उपस्थित होते.