अजय धोबे सह इतर दोन अपक्षांचा देरकर यांना पाठिंबा.

0
286

संभाजी ब्रिगेडचा मविआचे उमेदवार संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा..

संजय देरकर आमदार व्हावे हि सर्वसामान्यांची इच्छा, जनभावनेचा अनादर करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल- अजय धोबे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष.

लोकवाणी जागर…

वणी विधानसभा मतदारसंघातील २०२४ ची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि निर्णायक वातावरणात होत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपला लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविणार आहोत. जो तुमच्या आमच्या आशा आकांक्षाचा प्रतिनिधी असणार आहे. सोबतच तुमचे आमचे अत्यंत मूलभूत आणि जिव्हाळ्याचे प्रश्न शासन स्तरावर सोडवणे अपेक्षित आहे.

संभाजी ब्रिगेड एक नोंदणीकृत राजकीय पक्ष असून यावर्षी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने इंडिया आघाडीचे बाजूने सक्रीय सहभाग घेतला होता. याचे कारण संभाजी ब्रिगेडची महाराष्ट्र स्तरावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत युती होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड इंडिया आघाडीचा एक भाग होता. हा आघाडी धर्म पाळुन देशामध्ये धर्माध विचाराचे आणि अराजकतेकडे नेणारे सरकार नको म्हणून निवडणुकीत संभाजी ब्रिगेड सर्वशक्तीनिशी लढली होती. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात विशेषतः महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला अभुतपूर्व यश मिळाले. परंतु काही कारणास्तव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत ची युती संपुष्टात आली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक राजकीय समीकरणाचा विचार करत संजय देरकर आमदार व्हावे ही जनतेची अपेक्षा  आहे. हा कल ओळखून याच प्रामाणिक भूमिकेतुन संभाजी ब्रिगेड वणी विधानसभा सभेकरिता आपला नामांकन अर्ज मागे घेउन संजय देरकर यांना जाहीर पाठींबा देत आहे. ह्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पुरोगामी, परिवर्तनवादी विचाराच्या मतांची मतविभागणी होवु नये . ही प्रामाणिक भावना सर्वसामान्य जनतेची आणि संभाजी ब्रिगेडची सुद्धा असल्याचे मत अजय धोबे यांनी व्यक्त केले.आणि या कर्तव्य इतर सर्व उमेदवाराला पराभुत करण्याकरिता संभाजी ब्रिगेड संजय देरकर यांना पाठींबा जाहीर करित आहे. कृपया संभाजी ब्रिगेडची ही अधिकृत भूमिका गृहीत धरावी. आणि संजय देरकर यांना विजयी करण्याकरिता सर्वसामान्य जनतेने सुद्धा सहकार्य करावे.असे नम्र आवाहन आणि विनंती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि वणी विधानसभा प्रमुख अजय धोबे यांनी केले आहे.

संजय देरकर यांचा विजय पक्का… जनभावनेचा अनादर करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल — अजय धोबे.

संपूर्ण वणी मतदार संघातील जनतेच्या मनात  असलेले संजय देरकर यावेळी आमदार व्हावे, असे वातावरण तयार झालेले आहे. त्यांच्या पाठीशी फार मोठा जनाधार आहे.सर्वसामान्य जन भावनेचा आदर करता, संभाजी ब्रिगेड च्या वतीने, पदाधिकारी मेळावा घेऊन त्यांना पाठिंबा घोषित केला. काही लोकांनी निवडणुका हा धंदा केला आहे, स्वहित साध्य न झाल्यामुळे जन भावनेला महत्त्व न देत वेगळ्या चुली मांडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जनता आता हुशार झाली आहे. त्यामुळे संजय दरेकर हेच आमदार होतील व भरघोस मतांनी निवडून येतील… अजय धोबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here