किरणताई देरकर यांचा प्रचाराचा झंझावात….
प्रत्यक्ष जनसंपर्क ला प्राधान्य देत घेत आहे भेटी…..
लोकवाणी जागर..
वणी परिसरातील प्रसिद्ध चिखली व येनक येथिल जगदंबा मातेचे दर्शन घेत किरण देरकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दरेकर यांच्या प्रचारात त्यांच्या अर्धांगिनी किरण ताई देरकर यांचा प्रचाराचा झंजावात सुरू आहे.
संपूर्ण विधानसभा क्षेत्रात महिला संघटनेच्या माध्यमातून त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे. यापूर्वी अनेक गावांमध्ये महिलांचे मेळावे, हळदीकुंकवांचे कार्यक्रम घेऊन संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेला आहे. त्यामुळे त्यांचा महिलांशी असलेला दांडगा संपर्क या निवडणुकीत फार मोठा प्रभाव पाडणार आहे.