सिलेंडरच्या स्फोटा मध्ये संपूर्ण वस्तू जळून खाक, प्रसंगवधानामुळे जीवितहानी टळली.
आनंद नक्षणे – मारेगाव
तालुक्यातील गाडेगाव येथे आज सकाळी घरी सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.घटना आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळी 8:30 वाजता सुमारास घडली.
यामध्ये भारत झुकलुजी दाते यांचे घरासहित घरातील संपूर्ण वस्तू खाक झाल्या आहे , जीवन उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले आहे. भारत हे रोज मजुरी व मच्छीमारीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
त्यांनी आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळच्या सुमारास मार्डी येथुन सिलेंडर आणून घरात लावला सदर सिलेंडरचे कनेक्शन भारत यांच्या आईच्या नावाने आहे.सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नी स्वयंपाक करण्यासाठी सिलेंडर सुरु करायला गेले असता सिलेंडर लिकेज असल्याने आग लागली, त्यांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांनी घराबाहेर निघून स्वतःसह कुटुंबाचा जीव वाचवला या आगीमध्ये त्यांचे घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले व घरकुलचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून मिळालेले 15 हजार रोख व रोज मजुरीतून गोळा केलेले 35 हजार रुपये रोख एकूण 50 हजार रुपये नगदी सुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाले आहे. व पूर्ण साहित्यसह भारत यांचे 2 लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. तरी जे काही शासनाकडून मदतीची आर्त हाक करत आहे….