उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळण्याची शक्यता…

0
892

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळण्याची शक्यता…

वणीत सोयाबीन कापूस चे पडलेले भाव व त्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटणार ?

राजु तुरणकर – संपादक.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची उद्या महाविकास आघाडीचे (ऊबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ भव्य अश्या ऐतहासिक सभा वणी येथिल पाण्याच्या टाकी जवळील शासकिय मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या मालांचे पडलेले भाव, परिसरातील प्रतिष्ठ समाजाबद्दल बोललेले ते शब्द यावरून शेतकरी शेतमजुर व स्वाभिमानी समाजबांधवांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.

हा असंतोष व्यक्त करताना सर्व सामान्य जनता दिसून येत आहे,ती खदखद मतदार, मतदान करतांना कोण्याच्या बाजून जाईल या वरून निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे…

उद्धव साहेब काय बोलणार याकडे वणीकर जनतेचे लक्ष…

उद्या होणाऱ्या सभेत उद्धव साहेब पक्षांतर्गत घडामोडी, शेतकऱ्यांचा असंतोष, वणी परिसरातील वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व समाजाबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य यावरून तापलेले राजकारण यावर काय वक्तव्य करतील याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here