मतदानापूर्वी मतदाराच्या बोटाला शाई लावून मतदान पासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र :- राजेंद्र गायकवाड शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख.
प्रशासनाला व मतदाराला जागृत राहण्याचे आवाहन….
छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार कालपासून बंद झाला आहे. मात्र आता राजकीय पक्षांकडून छुप्या पद्धतीने पैसे वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी मतदारांना पैसे देणाऱ्या आणि ते घेणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
याच्य पध्दतीने लोकसभा निवडणुकीत यवतमाळ येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी बोटाला पैसे देऊन शाई लावण्याच्या प्रकार स्वतः उघडकीस आणून गुन्हेगारांना पकडून दिले होते…
हिच बाब हेरून वणी विधानसभा क्षेत्रातसुद्धा असा प्रकार घडवून आणण्याचा डाव आखल्याचे गुप्त माहिती मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्क मूक राजेंद्र गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून भरारी पथकाशी चर्चा केली व या संदर्भाने उद्या या बाबीवर पाठ ठेवण्याकरता शिवसैनिक कडून चार भरारी पथके तयार करण्यात आली आहे अशी माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली.